वाचा:
शेतकरी कर्जमाफी व महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर भाजपनं आज राज्यभरात धरणं आंदोलनं केली. मुंबईतील आझाद मैदानातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला. येथील आंदोलनात फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व नेते सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस यांनी आपल्या सरकारच्या कामांचा पाढा वाचून दाखवत आताच्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ‘सरकारला जागं करण्यासाठी भाजपचं हे धरणं आंदोलन सुरू आहे. ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केलीय. हे सरकार म्हणजे वचनभंगाची सुरुवात आहे. २५ हजार रुपये हेक्टरी देण्याचं वचन दिलं गेलं होतं. त्याचं काय झालं, असा सवाल फडणवीस यांनी केला. कर्जमाफीची घोषणा करून तीन महिने लोटले तरी केवळ १५ हजार शेतकर्यांची यादी आली आहे. याच गतीने याद्या येत राहिल्या तर जितका डाटा अपलोड झाल्याची माहिती देण्यात येत आहे, त्यानुसार सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हायला ४६० महिने म्हणजे ३८ ते ३९ वर्षे लागतील. इतके दिवस हे सरकार तरी टिकणार आहे का, असा सवाल फडणवीस यांनी केला.
वाचा:
‘हे सरकार आज काय करतंय? मागच्या सरकारनं केलेली कामं रद्द करण्याची कामं करतंय. ‘जलयुक्त शिवार’ योजनेबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्रुटी असल्याचं सांगितलं जातंय. त्रुटी असतील तर सुधारा ना, असं सांगतानाच, ‘काम करायचं नसलं की १७ बहाणे सांगता येतात,’ असा चिमटाही त्यांनी काढला.
महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही!
स्वातंत्र्यवीर सावरकर, शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. पण शिवसेना मूग गिळून बसली आहे. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. पण आपल्या महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times