म. टा. प्रतिनिधी,

इचलकरंजी येथे कार्यरत असलेले बनावट नोटा छापून ते खपविणाऱ्यांचे रॅकेटच पोलिसांनी पकडले. जिल्ह्यात एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनावट नोटा छापणारी टोळी पकडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे रॅकेट आंतरराज्य असल्याने पोलिस कर्नाटकात जावून अधिक तपास करणार आहेत. ( were being printed in )

इचलकरंजी येथील कल्लाप्पाणा आवाडे इचलकरंजी बँकेत आठ दिवसापूर्वी बनावट नोटा सापडल्या होत्या. त्यांनी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल केला होता. त्याचा शोध घेत असताना शिवाजीनगर पोलिसांना या नोटा जिल्ह्यातच छापल्या जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी अंबाजी सुळेकर व राजू लवंगे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पन्नास, शंभर, दोनशे,पाचशे व दोन हजाराच्या बनावट नोटा ताब्यात घेतल्या. याशिवाय बनावट नोटा छापायचे मशीन, संगणकही जप्त केले.

क्लिक करा आणि वाचा-
गेले अनेक महिने संशयित आरोपी बनावट नोटा छापून खपवत होते. कर्नाटकातही त्या मोठ्या प्रमाणात खपविले जात असल्याने या प्रकरणाचा कर्नाटक कनेक्शन आहे. यामुळे अजून या प्रकरणात कोण कोण सहभागी आहेत याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे हे अधिक तपास करत आहेत.

६ ऑगस्ट या दिवशीही उघड झाले होते रॅकेट
दोन हजार व पाचशेच्या बनावट नोटा छापून ते खपवणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली होती. गेले वर्षभर राधानगरी तालुक्यात नोटा छापून हे दोघेही ते खपवत होते. त्यांची ही बनावटगिरी उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी अनिकेत अनिल हळदकर व उत्तम पवार या दोघांनाही अटक करण्यात आली.

क्लिक करा आणि वाचा-
याबाबत अधिक माहिती अशी, राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी येथे उत्तम पवार यांच्या शेतात बनावट नोटा छापण्यात येत होत्या. ते खपवण्याचे काम हळदकर करत होता. दहा दिवसापूर्वी हळदकर याने राजारामपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दोन हजाराच्या ६७ नोटा जमा केल्या. बँकेतील कॅशियरने त्या नोटा जमा करून घेतल्या. नंतर या नोटा इतर खातेदारास दिल्यानंतर त्याला नोटा घेताना शंका आली. त्यामुळे त्याने कॅशियरला याबाबत माहिती दिली. ६७ नोटांमध्ये सतरा नोटा या एकाच सिरीयल क्रमांकाच्या होत्या. त्यामुळे कॅशियरने तातडीने राजारामपुरी पोलिस ठाण्याची संपर्क साधला.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here