जुबेर हा रिक्षा चालवून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता. त्याची पत्नी नजमाबी ही देखील बचतगट आणि इतर काम करुन संसाराला हातभार लावत होती. गेल्या महिन्यात नजमाबी यांनी स्वयंपाक घरात गळफास घेत आत्महत्त्या केली होती. या धक्क्यातून सावरत असलेल्या जुबेर याच्यावर देखील काही प्रमाणात कर्ज झाले होते. यातून तो नैराश्यात गेला होता. अखेर गुरुवारी जुबेर यानेही गळफास आत्महत्या केली.
ही घटना उघडकीस येताच नातेवाईकांनी जुबेर याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पवार यांनी तपासणी करुन जुबेरला मृत घोषित केले.
खाटीक दाम्पत्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे त्यांच्या १० वर्षीय मुलीच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपलं आहे. या घटनेमुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनाही धक्का बसला. मृत जुबेर याच्या पश्चात दहा वर्षीय मुलगी, तीन भाऊ व आई असा परिवार आहे.
दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times