पती आणि पत्नी दोघेही दुकानात मोाबईल खरेदी करण्यासाठी गेले होते. मात्र पत्नीने महागडा मोबाईल घेण्याची जिद्द केली. पैसे नसल्याने दोघेही मोबाईल न घेताच घरी आले. घरी परत आल्यावर दोघांमध्ये मोबाईलच्याच मुद्द्यावरून प्रचंड वाद झाला. याच वादात रागाच्या भरात सिक्युरिटी गार्ड असलेल्या पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबला. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
पत्नीच्या मृत्यूनंतर भयभीत झालेल्या पतीने स्वत:च पोलीस स्टेशनला माहिती देऊन अटक करवून घेतल्याची घटना दि. १२ ऑगस्ट रोजी समोर आली.
लग्नाला वर्ष पूर्ण होण्याआधीच…
आदर्श नगर येथील विजू राठोड नामक युवकाचा मागील ११ महिन्यांपूर्वी आर्वी येथील पूजा राठोड हिच्याशी विवाह झाला होता. भाड्याच्या घरात दोघांचा सुखी संसार सुरू होता. मात्र काही दिवसांपूर्वी पूजा राठोड हिचा मोबाईल जमिनीवर पडल्याने फुटला. त्यानंतर पूजा आणि तिचा पती विजू हे दोघे मोबाईल घेण्यासाठी एका दुकानात गेले. यावेळी पूजाने विजूकडे २२ हजारांचा मोबाईल घेऊन देण्याचा तगादा लावला.
पैसे नसल्याने दोघेही दुकानातून घरी परत आले. मात्र काही वेळातच दोघांमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला. रागाच्या भरात विजूने पूजाचा गळा दाबला. राग शांत झाल्यावर पूजाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर भांबावलेल्या विजूने तात्काळ पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती स्वत:च पोलिसांना दिली. चक्क आरोपीकडून अशी माहिती मिळाल्याने पोलीस कर्मचारीही अवाक् झाले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व आरोपीला अटक केली. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times