कानपूरः उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ही घटना आहे. कानपूरच्या बर्रा-८ मधील वस्तीत छेडछाड प्रकरणातील एखा आरोपीला भाजप आमदार महेश त्रिवेदी यांच्या मुलाने आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात मारहाण केली. पोलिसांसमोर ही मारहाण झाली. पोलिस मूक दर्शक बनून घटना बघत राहिले. या प्रकरणी नंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात जमावाकडून एका व्यक्तीला मारहाण करण्यात येत आहे. तर जमावाच्या तावडीत सापडेल्या आपल्या वडिलांना मारहाणीपासून वाचवण्यासाठी लहान मुलगी त्यांना बिलगुन रडताना दिसत आहे. तरीही जमावाकडून मारहाण सुरूच होती. हे प्रकरण दोन वेगवेगळ्या समाजांशी संबंधित असल्याने वातावरण तणावाचं बनण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून पोलिसांची एक तुकडी तैनात केली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

मुलीच्या कुटुंबीयांचा धर्मांतराचा आरोप

बर्रा-८ येथील एका युवतीने वस्तीत राहणाऱ्या तीन तरुणांवर छेडछाडीचा आणि २० हजार रुपये देऊन धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. मुलीच्या आई यासंबंधी आमदार महेश त्रिवेदी यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर बर्रा पोलिसांनी ३१ जुलैला आरोपी सद्दाम, सलमान आणि मुकुल यांच्याविरोधात छेडछाडीसह इतर आरोपांवरून एफआयआर दाखल केली होती.

बळजबरी धर्मांतराचा प्रयत्न होऊनही पोलिसांनी संबंधीत आरोपांप्रकरणी एफआयआर दाखल केली नाही आणि आरोपींना अटकही केली नाही. यावरून भाजपचे किडवई नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश त्रिवेदी यांचा मुलगा शुभम त्रिवेदी, बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि परिसरातील काही जणांनी बुधवारी संध्याकाळी रामगोपाल चौकात एकजूट होऊन नारेबाजी केली.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आमदाराचा मुलगा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी वादावादी झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी आरोपीला घराबाहेर काढलं. यानंतर पोलिसांसमोर त्याला मारहाण केली. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि पोलिस ठाण्यात नेलं.

छेडछाड आणि धर्मांतराच्या आरोपीची पत्नी कुरैशा बेगमने धर्मांतरचा आरोप करणारी महिला आणि तिच्या पतीविरोधात मारहाणीची एफआयआर बर्रा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. यानंतर दुसऱ्या पक्षाने ३१ दुलैला तिन्ही भाऊ सद्दाम, सलमान आणि मुकुलविरोधात छेडछाडीसह इतर आरोपांवरून क्रॉस एफआयआर दाखल केली. बर्रा पोलिस आता या प्रकरणी तपास करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here