मुंबई: शहरातील करोना संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळाले असले तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्याने मुंबईकरांना काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर करोनाच्या विषाणूशी लढा देण्यासाठी मुंबईतील किती टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत याची पाहणी महानगरपालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी आता महापालिकेने पाचवे सिरो सर्वेक्षण हाती घेतले आहे.

मुंबई महानगर पालिकेने आतापर्यंत एकूण ४ सिरो सर्वेक्षण केले आहेत. तर पाचव्या सिरो सर्वेक्षणामध्ये महापालिका एकूण आठ हजार नमुने संकलित करून त्याची वैद्यकीय चाचणी घेणार आहे.

क्लिक करा आणि वाचा-

मुंबईतील विविध वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये किती प्रमाणात अँटिबॉडीज तयार झाल्या हे तपासण्यासाठी महापालिका सिरो सर्वेक्षण हाती घेते. महापालिकेने आपले पहिले सिरो सर्वेक्षण गेल्या वर्षी जुलै महिन्यात, तर दुसरे सर्वेक्षण ऑगस्ट महिन्यात घेतले. हे सर्वेक्षण महापालिकेच्या तीन प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आले. त्यानंतर तिसरे सिरो सर्वेक्षण हे मार्च २०२१ मध्ये करण्यात आले. यानंतर लहान मुलांसाठी चौथे सर्वेक्षण हे मे-जून २०२१ मध्ये करण्यात आले. हे एकूण २४ प्रशासकीय विभागांमध्ये घेण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा-
महापालिका पाचवे सिरो सर्वेक्षण हे २४ प्रशासकीय विभागांमधील दवाखान्यांच्या मदतीने करत आहे. काही जनरस प्रॅक्टिशनर्सच्या दबाखान्यांमध्ये या सर्वेक्षणाची कार्यवाही करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात घेतलेल्या एकूण ८ हजार नमुन्यांची तपासणी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण आयडीएफसी आणि एटीई चंद्रा फाउंडेशनच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here