‘बिग बॉस ओटीटी’ चं प्रक्षेपण २४ तास प्रेक्षकांसाठी सुरू ठेवण्यात आलं आहे. त्यात घरातील सदस्य एकमेकांसोबत बोलताना देखील दाखवले जातात. मूसने केलेल्या वैयक्तिक खुलाशाने सगळेच चकित झाले आहेत. मूस गुरुवारी प्रतीकसोबत बोलत असताना प्रतिकने मूसला मुली आवडतात की मुलं असा प्रश्न विचारला. त्यावर मूस म्हणाली, ‘मी मुलाकडे जास्त आकर्षिली जाते. पण जेव्हा संबंध बनवायची गोष्ट येते तेव्हा मुली माझ्यासाठी जास्त महत्वाच्या ठरतात. मला मुलं आवडतात पण मी लग्न एका मुलीसोबतच करेन.’
मूसच्या या खुलाशाने अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. जिथे काही नेटकरी या खुलाशाने चकित झाले आहेत तिथे काही युझर्स मूसला पाठिंबा देताना दिसत आहेत. युझर्स मूसचं कौतुक करत आहेत. आपली सेक्शुअल पसंती अशी सगळ्यांसमोर बिनधास्तपणे मांडल्याबद्दल नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. मूसचं बेधडक बोलणं नेटकऱ्यांना आवडलं आहे. मूस २० वर्षाची आहे. ती ऑस्ट्रेलियामध्ये जन्मली आणि वाढली आहे. मूसचे आई- वडील पंजाब प्रातांतील मोहाली येथे राहणारे आहेत. यापूर्वीही अनेक मुद्द्यांवरून बेधडक बोलल्यामुळे मूस सोशल मीडियावर चर्चेत राहिली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times