अमरावती: जिल्ह्यात सातत्याने हत्या व अपराधांमध्ये वाढ होत असतांना गुरुवारी शहरातील यशोदा नगर परसिरात अनिकेत ज्ञानदेव कोकणे नामक १७ वर्षीय युवकांची जुन्या वादातून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. एखाद्या चित्रपटातील सिन प्रमाणे ही घटना घडली. तीन आरोपींनी मृतक युवकावर लक्ष ठेवून त्यांची भर रस्त्यावर धारदार शस्त्राने हत्या केली

यशोदा नगर परिसरातील गल्ली नंबर ४ मध्ये अनिकेत कोकणे एका कामानिमित्त बाहेर जात असल्याची माहिती हल्लेखोरांना समजली. त्यानुसार त्यांनी अनिकेतचा पाठलाग करत तीन युवकांनी त्याच्यावर धारदार शस्त्र्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात अनिकेत जागीच गतप्राण झाला. हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले. फ्रेजरपुरा पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह ताब्यात घेवून आरोपीचा शोध सुरु केला आहे.

जुन्या एका हत्याकांडात अनिकेत कोकणे हा आरोपी होता तो काही दिवसांपूर्वीच बालसुधार गृहातून परत आला होता याची माहिती हल्लेखोरांना होती तेव्हापासूनच ते त्याच्यावर पाळत ठेऊन होते अशी चर्चा परिसरात होती. हल्लेखोरांची ओळख पटली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. या घटनेतील आरोपी अनिकेत कोकणे नुकताच बाल सुधारगृहात मधून आल्यानंतर त्याच्यावर या आरोपींनी अनेक दिवसापासून पाळत ठेवत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

शहरात एकाच दिवशी दीड तासांच्या अंतरात दोन हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यात सह शहरात सातत्याने गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे वाढणाऱ्या अपराधांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here