नाशिक: तब्बल आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गोत्यात आलेल्या व एसीबीच्या चौकशीनंतर फरार झालेल्या जिल्हा परिषदेच्या (माध्यमिक) शिक्षणाधिकारी वैशाली झनकर लाचलुचपत कार्यालयात स्वतः हजर झाल्या आहेत. अटकपूर्व जामिनावर सुनावणी होण्यापूर्वी त्यांनी एसीबी कार्यालय गाठले. यामुळे त्यांना आता कोर्टात हजर करण्यात येईल. अटकपूर्व जमीन फेटाळला जाण्याची शक्यता असल्यानं त्या हजर झाल्याची चर्चा आहे.

एका शिक्षण संस्थेशी संबंधित चार शाळांना शासनाकडून २० टक्के अनुदान मंजूर झालं आहे. या अनुदानानुसार शाळेतील ३२ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची पदनिश्चिती करून त्यांचं नोव्हेंबर २०२० पासून थकीत असलेलं वेतन काढून देण्यासाठी तसंच वेतन नियमित पुढं सुरू ठेवण्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्या वतीनं प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनी तक्रारदाराकडं ९ लाखांची लाच मागितली. एसीबीनं पडताळणी केली असता, वीर यांनी तडजोडीअंती ८ लाख रुपये स्वीकारण्याचं मान्य केल्याचं आढळून आले. शिवाय पुढील व्यवहार त्यांचा शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर येवले यांच्याशी करण्याविषयी सांगितलं होतं.

वाचा:

या सगळ्या माहितीच्या आधारे मंगळवारी एसीबीनं नाशिकमध्ये कारवाई करत तक्रारदाराकडून ८ लाखांची लाच स्वीकारताना येवले याला रंगेहात पकडलं. तसंच, वीर आणि दशपुते यांनाही एसीबीनं ताब्यात घेत तिघाहीविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईनंतर एसीबीने तिघाही आरोपींच्या घरी छापे मारत घराची झडती घेतली. मात्र, शिक्षणाधिकारी वीर या अचानक फरार झाल्यानं एकच खळबळ उडाली. एसीबीकडून त्यांचा शोध घेतला जात होता. मात्र, आज त्या स्वत:च एसीबीच्या कार्यालयात हजर झाल्या.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here