मुंबई– लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्या सौंदर्याची तुलना कुणासोबतही होऊ शकत नाही. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याने मागे वळून पाहिलं नाही. ऐश्वर्याच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. परंतु, असं म्हटलं जातं की या जगात एकसारख्या दिसणाऱ्या सात व्यक्ती असतात. ऐश्वर्याच्या बाबतीत हे वाक्य जणू सत्यात उतरलंय. जगभरात ऐश्वर्यासारख्या दिसणाऱ्या या सहा व्यक्तींची प्रचंड चर्चा आहे. त्यातील एक तर मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेली अभिनेत्री आहे. चला जाणून घेऊन त्यांच्याबद्दल.

१. स्नेहा उलाल
स्नेहाचा चेहरा ऐश्वर्याच्या चेहऱ्याशी खूप जास्त मिळताजुळता असल्याने तिची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. ‘लकी: नो टाइम फॉर लव्ह ‘ चित्रपटात स्नेहाने मुख्य भूमिका साकारली होती. परंतु, ती अभिनय क्षेत्रात फार कमाल दाखवू शकली नाही.

२. मानसी नाईक
मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हिला देखील ऐश्वर्याची कार्बन कॉपी म्हटलं जातं. मानसी अनेकदा ऐश्वर्याप्रमाणे सजून रिल्स बनवत असते. त्यामुळे चाहते अनेकदा तिची तुलना ऐश्वर्यासोबत करतात. मानसीने बॉक्सर प्रदीप खरेरा सोबत लग्न केलं आहे.

३. आमना इम्रान
इंटरनेटवर प्रचंड लोकप्रिय असलेली पाकिस्तानी महिला आमना इम्रान हिचे काही फोटो हुबेहूब ऐश्वर्याप्रमाणे आहेत. तिचा चेहरा ऐश्वर्यासोबत इतका मिळताजुळता आहे की पाहणारा बुचकळ्यात पडेल. आमना स्वतः ऐश्वर्याची मोठी चाहती आहे.

४. अमुज अमृताअमुज अमृताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होतात. अमुजदेखील दिसायला हुबेहूब ऐश्वर्याप्रमाणे आहे. अमुजच्या फोटोंमध्ये ती अगदी ऐश्वर्या प्रमाणे दिसते.

५. आशिता सिंह

अलीकडे आशिता देखील तिच्या व्हिडिओंमुळे चर्चेत आली होती. आशिताने शेअर केलेल्या व्हिडिओत ती हुबेहूब ऐश्वर्याप्रमाणे दिसत असल्याने चाहत्यांचा गोंधळ उडाला होता.

६. महालघा जाबेरी
महालघा जाबेरी ही एक इराणियन मॉडेल असून अनेक मॅगझीनमध्ये तिचे फोटो येत छापून येत असतात. ऐश्वर्याप्रमाणे दिसत असल्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये ती ऐश्वर्याची कार्बन कॉपी म्हणून प्रसिद्ध आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here