केंद्रीय मंत्री भागवत कराड यांची जन आशीर्वाद यात्रा १६ ऑगस्ट या दिवशी परळी येथील गोपीनाथ गडावरून सुरू होईल. पंकजा मुंडे या यात्रेला उपस्थित राहणार असून त्यांच्याच हस्ते या यात्रेचा आरंभ होणार आहे. ही माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी दिली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी भागवत कराड यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचे बोलले जात होते. यामुळे मुंडे समर्थकांमध्ये मोठी नाराजी असल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यामुळेच भागवत कराड आपली जन आशीर्वाद यात्रा घेऊन बीडमध्ये येणार नाहीत, अशी चर्चा होती. मात्र, आता पंकजा मुंडे यांच्याच हस्ते त्यांच्या यात्रेता शुभारंभ होणार असल्याचे मुंडे यांची नाराजी दूर झाली का?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात जोरात सुरू झाली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
भागवत कराड यांच्या या यात्रेसाठी पंकजा मुंडे यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे या देखील उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी, १६ ऑगस्ट रोजी पंकजामुंडे या बीडमध्ये एका कार्यशाळेत उपस्थित राहणार आहेत. तेव्हा त्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा सत्कारही करण्यात आला. यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा अधिकच होऊ लागली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times