म.टा.प्रतिनिधी लोणावळा

मावळातील आंदर मावळातील व तळेगाव दाभाडे एमआयडीसी जवळील आंबळे परिसरातील सुमारे १० कोटी रूपयांच्या बेकायदेशीर उत्खननाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी तळेगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे व भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे हे उपस्थितीत होते. ( demands probe into rs 10 crore )

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके करून निसर्गाचा -हास करत असुन, हा प्रकार अत्यंत गंभीर असताना सत्ताधारी आमदारांना पाठीशी घालत आहे. असा गंभीर आरोप केला आहे. यावेळी किरीट सोमय्या यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आघाडी सरकारवर त्यांनी निशाणा साधला.

ठाकरे सरकार आल्यापासून केवळ भ्रष्टाचार करण्याचे काम केले आहे. करोना काळात हे सरकार अयशस्वी ठरलं आहे. कोणत्याच प्रकारचे नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रोज नवीन नवीन निर्णय देऊन ते रद्द करण्याचे काम सध्या ठाकरे सरकारचे सुरू असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.

क्लिक करा आणि वाचा-
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननाची प्रत्यक्ष पाहणी आज भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली. मावळ मधील आंबळे गावालगत असलेल्या धरणापासून १०० फूट अंतरावर गौण खनिज उत्खनन होत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. यामध्ये अवैधरित्या उत्खनन हे मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची कंपनी करत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. प्रत्यक्ष पाहणी नंतर किरीट सोमय्या यांनी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची भेट घेऊन मावळ तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाची माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्याकडे तक्रार दाखल केली असून त्यांच्याकडे देखील याप्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी देखील शंभर कोटीचा भ्रष्टाचार केला असल्याचा सोमय्या यांनी गौप्यस्फोट केला. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मावळातील झालेल्या व सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननाच्या बेकायदेशीर बाबींचा तपशील मांडला. अशाप्रकारच्या बेकायदेशीर उत्खननाची चौकशी करावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ व केंद्रीय प्रदूषण मंडळाकडे याबाबत तक्रार दाखल केल्याचे सांगितले आहे.

आमदार सुनिल शेळके यांना गौण खनिज उत्खननाची दोन गटात परवानगी असताना, त्यांनी इतर आठ गट नंबर मध्ये बेकायदेशीर उत्खनन केले आहे. किरीट सोमय्या यांनी या परिसराची पाहणी करून मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना या अनुषंगाने निवेदन दिले. मावळातील बेकायदेशीर उत्खननातून निसर्ग साधनसंपत्तीचा मोठे नुकसान झाले‌ आहे. हि बाब अत्यंत गंभीर असताना याकडे जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासन का कानाडोळा करत आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले.

क्लिक करा आणि वाचा-
यावेळी किरीट सोमय्या म्हणाले, ‘उत्खननातून निसर्ग प्रकृती छेडछाड होऊन मोठे नुकसान झाले आहे. धरणापासून शंभर फुटावर आमदाराचे उत्खनन आहे. सत्ताधारीच अशा प्रकारे उत्खनन करत आहे. कोणाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे. असे सांगून सोमय्या म्हणाले,”

या परिसराची पाहणी केली असता, गौणखनिज उत्खननाची परवानगी घेतलेल्या ठिकाणी मोठा खड्ड्यात पाणी साचले आहे. तर आठ ठिकाणी काम सुरू आहे. दगड, खडी, मशीन्स पडले आहेत. हे प्रकरण थेट वर पर्यंत घेऊन जाणार. अशाप्रकारच्या उत्खनाने धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे
अनेक जीव धोक्यात येईल. पैशासाठी निसर्गाची छेडछाड बंद करा. आमदारांनी गैरव्यवहार थांबवले पाहिजे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here