म. टा. प्रतिनिधी,

तालुक्यातील भोसे येथे मित्रांनीच मित्राचा खून करून मृतदेहाचे तुकडे कूपनलिकेत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दत्ता झांबरे असे मृताचे नाव असून, खुनाची घटना २७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी त्याचे मित्र अमोल खामकर आणि सागर सावंत या दोघांना पोलिसांनी अटक केली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत. संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. (friends friend in taluka of sangli)

मिरज ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दत्ता झांबरे (वय ३०, रा. भोसे, ता. मिरज) हा गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा होता. दत्ता झांबरे, अमोल खामकर आणि सागर सावंत हे तिघेही मित्र होते. २७ जुलै रोजी तिघेही मिरज-पंढरपूरोडवरील भोसे गावाजवळील बंद पडलेल्या पारस पावडर कंपनीच्या शेडमध्ये गेले होते. दत्ता झांबरे याने खामकर, सावंत यांना सिगारेट आणण्यासाठी सांगितले. सिगारेट आणायला वेळ झाला म्हणून दत्ता झांबरे हा खामकर व सावंत यांच्या अंगावर कोयता घेवून धावून गेला. सागर याने दत्ता झांबरे याच्या हातातील कोयता हिसकावून घेवून झांबरे याला लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याला खाली पाडले. यानंतर दोघांनी झांबरे याला डोक्यात दगड घालून, तसेच कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केले. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून कूपनलिकेत टाकल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे. दत्ता झांबरे हा सतत त्रास देऊन दमदाटी करायचा, यामुळे त्याचा काटा काढल्याची कबुली अटकेतील दोन्ही संशयितांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here