अमरावती: ‘वंचित बहुजन आघाडीनं मागच्या निवडणुकीमध्ये एकट्याच्या बळावर लढण्याचा प्रयोग केला. पण त्यांचा एकही आमदार, खासदार निवडून आला नाही. केवळ मतं खाण्याचं काम केलं गेलं आणि मतं खाण्याचं राजकारण करून सत्ता मिळत नाही,’ असा बोचरा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना हाणला आहे. ()

अमरावती दौऱ्यावर असलेल्या आठवले यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आंबेडकरांना टोला हाणला. होऊ शकेल का, असा प्रश्न आठवले यांना नेहमी विचारला जातो. कालही पत्रकारांनी त्यांना असाच प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, ‘लोक तर सगळे म्हणतात हाय हाय… लोक तर सगळे म्हणतात हाय हाय… रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचं काय…’ असा शेर त्यांनी बोलून दाखवला. रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं अशी माझी नेहमीच भूमिका राहिली आहे. मात्र, सध्या तसं काही होईल असं मला वाटत नाही. होत असेल तर त्या ऐक्यामध्ये सहभागी होण्याची आणि कुणाच्याही नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे,’ असं आठवले म्हणाले. ‘प्रकाश आंबेडकर हे पुढं आल्याशिवाय आरपीआयच्या ऐक्याला काही अर्थ नाही. ते येत असतील तर माझी तयारी आहे,’ असं आठवले यांनी स्पष्ट केलं.

वाचा:

‘रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी आणि नेत्यांनी मिळून एक ताकद उभी करणं गरजेचं आहे. आमच्या एकट्याच्या ताकदीवर एकही आमदार निवडून येऊ शकत नाही. वंचित बहुजन आघाडीनं मागच्या निवडणुकीत हा प्रयोग केला. पण काही साध्य झालं नाही. मतं फोडण्याचं काम झालं. मतं खाण्याचं राजकारण करून सत्ता मिळत नाही. सत्ता असल्याशिवाय गोरगरिबांना मदत करता येत नाही आणि कुणासोबत तरी युती केल्याशिवाय आपल्याला सत्ता मिळणार नाही हेही तितकंच खरं आहे,’ असं आठवले म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here