मुंबई: देशातील अनेक बँकांना सुमारे १० हजार कोटींचा चुना लावून विदेशात फरार झालेला उद्योगपती यांच्या मालमत्तेचा लिलाव सुरूच आहे. सध्या बंद असलेली मल्ल्याच्या मालकीची विमान कंपनी किंगफिशर एअरलाइन्सचे मुंबईतील मुख्यालय ”चा लिलाव अखेर झाला आहे. ही इमारत ५२.२५ कोटींना विकण्यात आली आहे. ( Sold For Rs 52.25 Crore)

वाचा:

हैदराबाद स्थित ‘सॅटर्न रिअल्टर्स’नं ‘किंगफिशर हाउस’ खरेदी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळ सांताक्रूझ येथे ही इमारत आहे. बाजारभावानुसार ‘किंगफिशर हाउस’ची मूळ किंमत १५० कोटी इतकी आहे. २०१६ साली या इमारतीचा पहिल्यांदा लिलाव ठेवण्यात आला होता. लिलावासाठी इमारतीची बेस प्राइस १३५ कोटी ठेवण्यात आली होती. मात्र, खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर आठ वेळा प्रयत्न करूनही इमारत विकली गेली नाही. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या लिलावात इमारतीची बेस प्राइस ५४ कोटींपर्यंत खाली आणण्यात आली होती. तरीही कोणी ही इमारत खरेदी करण्यात रस दाखवला नाही. मार्च महिन्यात या इमारतीसाठी नववा लिलाव झाला होता. तेव्हा सॅटर्न रिअल्टर्सनं ५२ लाखांची बोली लावली होती. अखेर ५२.२५ कोटींना इमारतीचा सौदा झाला आहे. विशेष म्हणजे, मूळ किंमतीपेक्षा एक तृतीयांश कमी किंमतीत ही इमारत विकली गेली आहे.

वाचा:

कर्ज वसुली लवादानं ही विक्री प्रक्रिया पार पाडली. विक्रीतून मिळालेले पैसे कर्जदारांना देण्यात येणार आहेत. विजय मल्ल्या याच्या नावावर असलेले समभाग विकून याआधीच ७,२५० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here