: क्षणभर झालेलं दुर्लक्ष कसं जीवावर बेतू शकतं, हे दाखवणारी धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात समोर आली आहे. आईसोबत कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या तीन मुली पाण्यात बुडाल्याची घटना घडली. यातील दोघी बहिणींचा तलावात झाला आहे, तर एका मुलीला वाचवण्यात यश आलं आहे.
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सुरुमगाव येथे ही घटना घडली आहे. ११ वर्षीय श्रावणी थोरात आणि ९ वर्षीय लक्ष्मी थोरात अशी मृत्युमुखी पडलेल्या बहिणींची नावं असून मुक्ताई थोरात असं वाचवण्यात आलेल्या मुलीचं नाव आहे.
या तीनही बहिणी आईसोबत कपडे धुण्यासाठी गेल्या असता तलावात अंघोळ करण्यासाठी उतरलेल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघीही पाण्यात बुडाल्या.आईसह एका गुराख्याने एकीला तलावाबाहेर काढलं. मात्र दुर्दैवाने श्रावणी आणि लक्ष्मी या दोघी जणींचा तलावात बुडून मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times