करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मुंबईला मोठा तडाखा बसला होता. दुसऱ्या लाटेत एकट्या मुंबईची करोना रुग्णांची संख्येत वाढ होऊन आकडा १० हजारांपर्यंत पोहोचला होता. मात्र, कठोर निर्बंध आणि पालिकेचं नियोजनामुळं आता मुंबईतील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे.
वाचाः
राज्याचे पर्यावरण मंत्री यांनी एक ट्वीट करत आनंदाची बातमी दिली आहे. शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ९. ५२ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. तर, १. ५१ लाख मुंबईकरांचे लसीकरण झाले. व आजघडीला मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच, तरीही मास्क वापरा, लस घ्या आणि सुरक्षित राहा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १ हजार ८६० दिवसांवर पोहोचला असून कोविड दरवाढीचा दर (७ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट) हा ०.०४ टक्के इतका आहे. याबरोबरच बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या सक्रिय रुग्ण, म्हणजेच ज्यांवर उपचार सुरू आहेत अशा रुग्णांची संख्या २ हजार ८७९ इतकी आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times