वाशिम: केंद्रीय मंत्री यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे यांना पत्र लिहून आपल्या कार्यालयाच्या भावना व्यक्त केल्या. ते पत्र व्हायरल झाल्याच्या दिवशी आणि आज असे दोन दिवस मी वाशीम जिल्ह्यात आहे. दोन्ही बाजू मी समजून घेतल्या. या संदर्भात माझे स्वतंत्र मत तयार केले आहे. माझा स्वतंत्र अहवाल मी स्वतः केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यांनी वाशीम येथे नियोजन भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले. (home minister for state will give separate report over letter by )

जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने राष्ट्रीय महामार्गावर काम करणार्‍या कंत्राटदाराने अथवा इतरांनी माझ्याकडे कोणत्याही स्वरुपाच्या तक्रारी केल्या नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पत्रानंतरच मला या संदर्भात माहिती मिळाली. दोन्ही बाजूच्या क्रिया आणि प्रतिक्रिया मी या दोन दिवसात जाणल्या आहेत. या संदर्भातील वस्तूनिष्ठ अहवाल पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवजी यांना देणार असल्याचेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

क्लिक करा आणि वाचा-
राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेनेच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तेक्षप वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून कामे रखडली असल्याचा आरोप पत्राच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात एक नवा वाद निर्माण झाला आहे. नितीन गडकरींच्या या पत्रानंतर शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली जात आहे.

क्लिक करा आणि वाचा-
या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले म्हणणे मांडले आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्राबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ठेकेदार चांगले काम करत असेल आणि काही जण राजकीय पक्षाचा आधार घेऊन किंवा मिळालेल्या पदाचा गैरवापर करुन जर कोणाला त्रास देत असेल तर तो ताबडतोब थांबवला पाहिजे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here