मुंबईः मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येत (Mumbai Coronavirus) घट होत असताना मुंबई महानगरपालिकेनं अनेक निर्बंध शिथिल (Mumbai Guidline) केले आहेत. १५ ऑगस्टपासून मॉल, मुंबई लोकल व दुकानांच्या वेळा वाढवून दिल्यानंतर चौपाट्या व उद्यानांबाबत मुंबई महानगर पालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईत पहिल्याच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ आणि मृत्युदराचा आलेख घसरता आहे. मुंबईतील करोना स्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळं मुंबईतील निर्बंध आणखी शिथिल करण्यात येणार आहेत. मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यासंबंधी आज आदेश जारी केले आहेत.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या व समुद्रकिनारे सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल, असं या आदेशात म्हटलं आहे. तसंच, सोशल डिस्टनसिंग, मास्कचा वापर बंधनकारक आहे, असंही या आदेशात नमूद केलं आहे.

वाचाः

हॉटेल व उपहारगृह ५० टक्के क्षमतेने सुरू होणार

१५ ऑगस्टपासून हॉटेल व रेस्टॉरंट सुरू ठेवण्यात रात्री १० पर्यंत मुभा देण्यात आली आहे. मात्र, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले असले पाहिजे, असं राज्य सरकारने आदेशात नमूद केलं आहे.

धार्मिक स्थळे, मल्टिप्लेक्स बंद

राज्यात व मुंबई महानगरपालिका क्षेत्रात नाट्यगृह, मल्टिप्लेक्स बंदच ठेवण्यात येणार आहे. तसंच, मंदिरांसह सर्व प्रकारची धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहार आहेत.

वाचाः

मुंबई लोकल सुरू

लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकलमुभा देण्यात आली आहे. या नागरिकांना लसीकरणाच्या प्रमाणपत्राच्या आधारे पास देण्यात येणार असून त्याआधारेच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here