निवृत्त न्यायाधीश असलेल्या वडिलांनी आपल्या मुलीचा विवाह २००७ मध्ये एका उच्चशिक्षित व प्रतिष्ठित कुटुंबात करुन दिला होता. पिडीतीचे पती व सासू, सासरे वकील आहेत. तर नणंद डॉक्टर आहे. लग्नानंतर काही वर्षांनी माझा वंश व मालमत्ता जपण्यासाठी मुलगा हवाय, म्हणत पिडीत महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. तर, मुलाच्या हव्यासापोटी परदेशात नेऊन तब्बल आठ वेळा गर्भपातही करण्यात आला.
वाचाः
२००मध्ये पीडित महिलेनं एका मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर पुन्हा २००१मध्ये ती पुन्हा गर्भवती राहिल्याने पतीने तिला डॉक्टरांकडे नेले आणि मूल नको असल्याचं सांगत गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडितेच्या अत्याचारात वाढ झाली. मुंबईत मुलगा होण्यासाठी उपचारही सुरू केले. तसंच, पतीने प्री इम्प्लांटेशन जेनेटिक जायग्नोसिस या टेस्टसाठी बँकॉकला नेले. तेथे ८ वेळा गर्भ धारणेच्या आधि एम्ब्रियोच्या लिंगाची तपासणी करुन उपचार व शस्त्रक्रिया करत होते. भारतात बंद असलेल्या उपचार करण्यासाठी संमतीशिवाय परदेशात नेऊन तब्बल आठवेळा गर्भपात करण्यात आलाय. फिर्यादीला दीड हजाराहून अधिक हार्मोनल आणि स्टिरॉइडचे इंजेक्शन देण्यात आली होती.
वाचाः
मुलगा होण्याच्या उपचारासाठी सासू आणि पतीने संयुक्त खाते उघडून खात्यातील ३४ लाखही त्यांच्या खात्यात वळते केले होते. सासरच्या लोकांचे अत्याचार सहन न झाल्याने पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित कुटुंबीयांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times