वाचा:
मागील महिन्यात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांची वर्णी लावली. राजकीय कुरघोडीतून पुन्हा एकदा मुंडे कुटुंबीयांवर अन्याय करण्यात आल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी राजीनाम्याची घोषणाही केली होती. पण तेव्हा पंकजांनी त्यांना थांबवले होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद अद्यापही कायम आहे. जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी आज कराड यांनी पंकजा यांची भेट घेतली. तेव्हा याच नाराजीची प्रचिती आली. पंकजा मुंडे यांच्या घराबाहेर कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते. ‘मुंडे साहेब अमर रहे… पंकजाताई अंगार है, बाकी सब भंगार है…’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.
वाचा:
कराड यांच्या भेटीनंतर त्यांच्या यात्रेला शुभेच्छा देण्यासाठीही पंकजा उपस्थित होत्या. मात्र, तेव्हाही कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरूच होत्या. त्यातील ‘अंगार… भंगार’ या घोषणेमुळं पंकजा मुंडे संतापल्या. अशा घोषणा देणाऱ्यांना त्या मूर्ख म्हणाल्या. ‘मी तुम्हाला असं वागायला शिकवलंय का? मूर्ख कुठले? मुंडे साहेब अमर रहे… या घोषणा मी रोखू शकत नाही. तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे. पण अंगार, भंगार हे काय लावलंय? हा दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम आहे का?,’ असा सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. ‘असं वागणं मला शोभत नाही. जेवढ्या मोठ्या उंचीची मी आहे, तेवढी लायकी ठेवा स्वत:ची. नाहीतर मला भेटायला येऊ नका,’ असं पंकजा यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times