नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबादमधील भव्य स्वागतानंतर आजचा दिवस धोरणात्मक निर्णय घेण्याचा आहे. आपल्या दौऱ्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ट्रम्प दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासी द्विपक्षीय चर्चा करतील. पाहुयात ट्रम्प यांच्या आजच्या कार्यक्रमाबाबतचे लाइव्ह अपडेट्स…

>> दोन दिवसांचा दौरा संपला, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेला रवाना

>> राष्ट्रपती भवनमध्ये ट्रम्प यांच्यासाठी स्नेह भोजन, मेनू कार्ड झाले जाहीर

>> राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले

>> अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानियासह राष्ट्रपती भवनमध्ये दाखल

>> दिल्ली: सर्वोदय शाळेत मेलानिया ट्रम्प यांनी घेतला नृत्याचा आनंद.

>> हे दोन्ही देशांच्या दृष्टीने उत्तम आहे- ट्रम्प

>> ड्रग ट्रॅफिकिंग रोखण्यासाठी भारताशी करार, भारताची उर्जेच्या गरजेची पूर्ती करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे- ट्रम्प

>> दहशतवादाला दोन्ही देश मिळून लगाम घालू; पाकिस्तानचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका

>> मी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि भारतातील लोकांनी केलेल्या स्वागतामुळे भारावून गेलो आहे. माझ्या हे कायम स्मरणात राहील- डोनाल्ड ट्रम्प

>> भारत आणि अमेरिकेदरम्यान ३ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार झाला- डोनाल्ड ट्रम्प

>> वैश्विक स्तरावर भारत आणि अमेरिकेचे सहकार्य आमच्या समान लोकशाही मूल्यांवर आधारित आहे- मोदी

>> गेल्या तीन वर्षांचा काळात आमच्या द्विपक्षीय व्यापारात दोन आकडी वाढ झाली आहे- मोदी

>> आमची ऊर्जा क्षेत्रातील भागीदारी मजबूत होत आहे आणि परस्पर गुंतवणूकही वाढत आहे. गेल्या ४ वर्षांमध्ये आमचा एकूण ऊर्जा व्यापार सुमारे २० बिलियन डॉलर इतका झाला आहे- मोदी

>> आज होमलँड सुरक्षेवर झालेल्या निर्णयाद्वारे या सहकार्याला अधिक बळ मिळेल. दहशतवागासबंधी आम्ही आमचे प्रयत्न अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे- मोदी

>> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब भारत दौऱ्यावर आले याचा मला आनंद- मोदी

>> पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची संयुक्त पत्रकार परिषद सरू

>> ट्रम्प आणि मोदी यांची द्विपक्षीय चर्चा समाप्त

>> दिल्लीतील सरकारी शाळेत अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प.

>> नानकपुरा येथील सर्वोदय सेकंडरी स्कूलमध्ये पोहोचल्या मेलानिया ट्रम्प. लहान मुलांनी केले स्वागत.

>> मेलानिया ट्रम्प यांचे लहान मुलांनी पारंपरिक पद्धतीने केले स्वागत.

>> मेलानिया ट्रम्प हॅपीनेस अभ्यासक्रम पाहण्यासाठी दिल्लीतील सरकारी शाळेत पोहोचल्या.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील द्विपक्षीय चर्चा सुरू

>> राजघाट येथे डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिजिटर्स बुकमध्ये लिहिला संदेश. ते म्हणतात, ‘अमेरिकेची जनता महात्मा गांधी यांच्या दृष्टीकोनातील सार्वभौम आणि एका अद्भुत भारताच्या सोबत ठामपणे उभी आहे. हा एक मोठा सन्मान आहे.

>> राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हैदराबाज हाऊस येथे पोहोचले, ट्रम्प आणि मेलानिया यांचे पंतप्रधान मोदी यांनी केले स्वागत

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यादरम्यान होणार द्विपक्षीय चर्चा. दुपारी १२.४० वाजता सुरू होणार चर्चा.

>> राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मेलानिया याच्यासह राजघाट येथे लावले झाड.

>> राजघाट येथे डोनाल्ड ट्रम्प यांना महात्मा गांधी यांची प्रतिमा भेट देण्यात आली

>> राजघाट येथे व्हिजिटर्स बूकमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लिहिला संदेश

>> डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांनी महात्मा गांधी यांना वाहिली श्रद्धांजली

>> ट्रम्प महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ असलेल्या राजघाट येथे पोहोचले

>> राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प राजघाटाकडे रवाना

>> ट्रम्प यांना दिली २१ तोफांची सलामी

>> भारताच्या तिन्ही सैन्य दलांकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’

>> राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत

>> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवनात आगमन

>> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here