कोल्हापूर : प्रदेशाध्यक्ष यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्यावर निशाणा ( Criticizes NCP Sharad Pawar) साधला आहे. “जे करायचे नाही, त्याचे खापर दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडण्यासाठीच शरद पवार हे मराठा आरक्षणाबाबत गावोगावी सभा घेणार आहेत, ‘पण या खोटं बोल पण रेटून बोल’ सभांची पोलखोल भारतीय जनता पक्ष करेल, त्यासाठी ते जिथे सभा घेतील, तेथे आम्ही सभा घेऊ,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

‘मराठा आरक्षण प्रश्नात ५० टक्के अटीचा अडथळा येणार आहे, आरक्षण देण्यात केंद्राची भूमिका अडचणीची ठरत आहे,’ असा आरोप करत शरद पवार यांनी गावोगावी जाऊन सभा घेत जनतेला वस्तुस्थिती सांगण्याची घोषणा केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोल्हापुरात आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत पाटील यांनी गावोगावी जाण्यापेक्षा मंत्रालयात एकत्र बैठक बोलवा, मग खरे कोण आणि खोटं कोण हे कळेल असा टोला मारला.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, पवारांनी केलेले विधान मती गुंग करणारे आहे. सत्याचा सामना करता येत नसेल तर गोंधळात टाकण्याची नीती वापरली जाते. मंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ पवारदेखील हीच नीती वापरत आहेत. ५० टक्के आरक्षणाची अट रद्द झाल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही, असं ते सांगत आहेत. मग ५८ वर्षे केंद्रात व राज्यात तुमचीच सत्ता होती, तेव्हा ही अट रद्द का केली नाही, असा सवाल पाटील यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण देण्याची दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची इच्छाच नाही. जे करायचे नाही, त्याचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडायचे आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे प्रकरण अंगलट आल्यानेच पवार खोटं बोलण्यासाठी सभा घेणार आहेत. पण ते जिथे सभा घेतील, तिथे आम्ही सभा घेऊन त्यांचा पोलखोल करू, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘एकीकडे मागासवर्गीय समितीला निधी नाकारायचे, २०१८ च्या आर्थिक व सामाजिक जनगणनेकडे दुर्लक्ष करायचे आणि दुसरीकडे केंद्राकडे बोट दाखवत आपण हात वर करायचे ही भूमिका बदला असे आवाहन करून पाटील म्हणाले, मराठा आणि ओबीसी समाजाला सारे कळते. ते दूधखुळी नक्कीच नाहीत, असंही पाटील म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here