देशमुख यांना मनी लाँड्रिंग आणि १०० कोटीं रुपयांच्या वसुलीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनेकदा नोटीस बजावून देखील ते चौकशीला हजर राहिलेले नाहीत. ईडीने कारवाई करू नये यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. हे लक्षात घेता आता त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करायला हवे, असे सोमय्या म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
‘अनिल देशमुख यांना तुरुंगात जावे लागणार’
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आता सचिन वाझेबरोबर तुरुंगात जावे लागणार आहे. त्यांना आता १ हजार कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेचा देखील हिशेब द्यावा लागणार आहे, असे किरीट सोमय्या म्हणाले. अनिल देशमुख यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आता अनिल देशमुख यांना तत्काळ अजामीनपात्र वॉरंट जारी करावे, त्यांना जारी करा आणि त्यांना फरारही घोषित करा अशी विनंती आपण ईडीला केली असल्याचे सोमय्या म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही मागण्या केल्या होत्या. यात तपासाला स्थगिती देणे, ईडीने पाठवलेले समन्स रद्द करावे, अटकेची कारवाई करण्यास मनाई करावी अशा मागण्यांचा समावेश होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या या मागण्या करणारी याचिका फेटाळून लावली.
यापूर्वी मुबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची अनिल देशमुखांसदर्भातील याचिका फेटाळली होती. आता सर्वोच्च न्यायालयानेही देशमुख यांची याचिका फेटाळल्याने हा अनिल देशमुख यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times