डंबाजी डोंगरे यांच्या शेतालगत जंगल आहे. १५ ऑगस्टला दुपारी ते बैलजोडी घेऊन शेतावर गेले होते. परंतु संध्याकाळ होऊनही डंबाजी हे घरी न परतल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते आढळून आले नाही. सोमवारी सकाळी जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वन संरक्षक मनोज चव्हाण, पोर्ला वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी, शेत्र सहाय्यक बोरावार, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
दरम्यान, मृत डंबाजी डोंगरे यांच्या शरीरावरील जखमांवरून त्यांना वाघाने ठार केल्याचा निष्कर्ष वनाधिकाऱ्यांनी काढला आहे. या घटनेनंतर डोंगरे कुटुंबियांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करून वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times