वॉशिंग्टनः अफगाणिस्तानवर हिंसक आणि क्रूर तालिबानने कब्जा केल्याच्या एक दिवसाने ( biden blames afghan leaders for ) अमेरिकेच्या अध्यक्षांनी मौन सोडले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष यांनी अफगाणिस्तानवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अफगाणिस्तानमधून सैनिकांच्या माघारीच्या निर्णयावर आपण अजूनही ठाम असल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे.

अफगाणिस्तानमधून अमेरिकेने आपल्या सैनिकांना माघारी बोलावल्यानंतर तालिबानने ज्या प्रकारे तिथे पुन्हा कब्जा केला त्यावरून अमेरिका आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यावर टीका होत आहे. यावर बायडन यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी काही वेळापूर्वी देशाला संबोधित केलं. मी आपल्या निर्णयावर ठाम आहे. २० वर्षांनी अतिशय कठीण निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे सैन्य माघारी घेण्यासाठी चांगली वेळ कधीच नव्हती. आम्ही मोठी जोखीम उचलली. त्यानुसार आम्ही सैन्य माघारी केली. पण यानंतर तालिबान पुन्हा अफगाणिस्तावर कब्जा करेल, याचा अंदाज आम्हाला होता. पण इतक्या वेगाने तालिबान ताबा मिळवेल असं वाटलं नव्हतं, असं बायडन म्हणाले.

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे हित हे कायम अमेरिकेच्या मातृभूमीवर युद्धग्रस्त देशातून दहशतवादी हल्ले रोखण्याचा होता. अफागाणिस्तानमध्ये अमेरिकेचे मिशन हे देश उभारण्याचे नव्हते, असं बायडन यांनी स्पष्ट केलं. अफगाणिस्तामधील सध्याच्या स्थितीला तेथील राष्ट्रपती अशरफ गनी जबाबदार आहेत. अशरफ गनी यांनी आपल्या जनतेच्या मदतीसाठी ठामपणे उभं रहायला हवं होतं. पण ते न लढताच रणांगण सोडून पळून गेले. पण अमेरिकेने हिंमत सोडलेली नाही. दहशतवादाविरोधात आमची लढाई सुरूच राहील, असं बायडन यांनी सांगितलं.

अमेरिकेने मोठा त्याग केला आहे. यामुळे आमच्या संसाधनांवर त्याचा परिणाम झाला आहे. देशाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला काही निर्णय घ्यायचे होते. आपल्या सैनिकांचा जीव आणखी धोक्यात घालू शकत नव्हतो. अमेरिकेचे काम हे अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाविरोधात लढण्याचे आहे, देश उभारण्याचे नाही, असं ते म्हणाले. अफगाणिस्तानमध्ये तैनात असलेल्या सैनिकांशी मी स्वतः बोललो. यानंतर हा मुद्दा मुत्सद्देगिरीने सोडवण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचे सैन्य तिथे आणखी किती काळ थांबले असते. एक वर्षे, पाच वर्षे. यामुळे परिस्थिती बदलली असती का? मी अशरफ गणी यांच्याशी बोललो. प्रशासनातील भ्रष्टाचार संपवा, असं आपण त्यांना सांगितलं. तालिबानविरोधात आपले सैन्य लढेल असा विश्वास गनी यांना होता, असं बायडन यांनी सांगितलं.

आम्ही ओसामा बिन लादेनचा एक दशक पाठलाग केला आणि त्याला ठार केलं. यामुळे सैन्य माघारीच्या निर्णयावर आपल्याला कुठला खेद नाही. तो अमेरिकेच्या हिताचा आहे. आपले सैनिक तिथे अधिक काळ ठेवणं हे देशाच्या हिताचं नव्हतं. आम्ही अफगाणिस्तानमध्ये ३ लाखावर सैन्य उभे केले होते. अब्जावधी रुपये खर्च केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अफगाणिस्तानमध्ये १५ हजाराहून अधिक अमेरिकेचे सैनिक होते. आमचे सरकार आल्यावर फक्त २ हजार सैनिक राहिले होते. आता अफगाणिस्तानमध्ये आमचे ६ हजार सैनिक आहेत. जे काबुल विमानतळाची सुरक्षा करत आहेत, असं बायडन म्हणाले.

आमच्या सैनिकांवर हल्ला झाला तर कठोर आणि वेगवान कारवाई करू, असं आम्ही तालिबानला स्पष्ट केलं आहे. अमेरिकेचे सैनिक तिथून जात आहेत. पण आम्ही तेथील स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. अफगाणिस्तानला पुढे नेण्याची आमची इच्छा आहे. अलिकडच्या काळात आमच्याकडून अनेक चुका झाल्या. आता अफगाणिस्तामधील स्थिती गंभीर झाली आहे. यासाठी संपूर्ण जगाने मदतीसाठी पुढे आलं पाहिजे, असं आवाहन बायडन यांनी केलं.

दहशतवाद्यांना संपवण्यासाठी आम्ही खूप काम केलं. पण देशाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागले. २० वर्षांपासून आपले सैन्य अफगाणिस्तानमध्ये लढत होते. आम्ही हिंमत हरलो आणि मोहीम मध्येच सोडली, अशी टीका लोकं करत आहेत. पण आम्ही योग्य निर्णय घेतला. आम्हाल आणखी सैनिकांचा जीव धोक्यात घालायचा नव्हता. अफगाणिस्तामध्ये लोकशाही स्थापन करण्याचं आमचं स्वप्न होतं. पण अफगाणिस्तानमध्ये अचानक परिस्थिती बदलली आणि अनेक देशांवर त्याचा परिणाम झाला, असं बायडन म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here