नवी दिल्लीः करोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता सरकारला सतावत आहे. यामुळे केंद्र सरकारने सोमवारी मोठा निर्णय घेतला. सरकारने रॅपिड अँटीजन टेस्टिंग किटच्या (RAT) निर्यातीवर बंदी घातली. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेने ट्रेडने (DGFT) निर्यात धोरणातील या बदलाची माहिती दिली. करोनाच्या तपासणीत लॅबमध्ये कामात येणाऱ्या केमिकलवरही बंदी घालण्यात आली आहे, असं DGFT ने म्हटलं आहे.

देशात करोनाच्या चाचणीसाठी RT-PCR आणि RAT चा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातोय. RT-PCR मधून व्हायरसची अचूक माहिती मिळते. तर RAT उपयोग हा संसर्गाचे त्वरीत निदान करण्यासाठी केला जातो. रुग्णाच्या रॅपिड अँटीजन टेस्टनंतर RT-PCR चाचणीतून अचूक निदान होत असल्याचं सांगण्यात येतं.

करोनाविरोधील लढाईत केरळला २६७ कोटींची मदत

करोनाविरोधी लढाईत केंद्र सरकारने केरळ सरकारला २६७.३५ कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. केरळ दौऱ्यावर असलेले केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सोमवारी ही घोषणा केली. मांडवीय यांनी राज्यातील तिरुवनंतपूरमध्ये जाऊन राज्यातील करोनाच्या स्थितीचा आढावा घेतला.

मांडवीय यांनी मुख्यमंत्री पी. विजयन आणि राज्याच्या आरोग्यमंत्री विणा जॉर्ज यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी मांडवीय यांनी करोनाविरोधी लढाईच्या तयारीचा आढावा घेतला. केरळला करोनाविरोधी लढाईत केंद्र सरकार सर्व मदत करेल. राज्याच्या पायाभूत सुविधांसाठी आपत्कालीन कोविड रेस्पॉन्स पॅकेज म्हणून केंद्र सरकार २६७.३५ कोटींची मदत देत आहे, असं मांडवीय म्हणाले.

मांडवीय यांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद यांचीही भेट घेतली. केरळमध्ये सद्या १ लाख ७९ हजार १५५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशातील लसीकरणाचा आकडा ५५ कोटींवर

देशात करोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. देशातील करोनावरील लसीकरणाचा आकडा हा ५५ कोटींवर गेला आहे. सोमवारी ८१ लाखांहून अधिक नागरिकांना लस दिली गेली. ऑगस्टच्या १५ दिवसांत लसींचे ७.५ कोटी डोस दिले गेले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सोमवारी ट्वीट करून माहिती दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here