अमरावतीः अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या आत्महत्येचं गूढ उकलण्याच्या मार्गावर आहे. अनिल मुळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लीप समोर आली आहे. त्यानुसार वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मुळेंनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत असलेल्या अनिल मुळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १४ ऑगस्टला समोर आली होती. या घटनेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यासह शहरात खळबळ उडाली होती. सदर ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. यात ऑडिओ क्लिप मध्ये मृतक पीएसआय अनिल मुळे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सर्व घटनाक्रम आपल्या मित्राला फोनवरून सांगितला आहे. ती ऑडिओ क्लीप आता व्हायरल झाली आहे.

ऑडिओ क्लिप मधला संवाद
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या मित्राला अनिल मुळे सांगत आहेत, की माझी काही चुकी नसताना मला वरिष्ठांकडून त्रास दिला जात आहे. मला दोन वेळा आपल्या वरिष्ठांनी शिक्षा केली आहे. मी पोलीस कमिश्नर आरती सिंह यांना सुद्धा भेटलो, तरी सुद्धा त्यांनी माझं ऐकून घेतलं नाही. तर माझी बदली झाली, प्रमोशन होऊन सुद्धा माझं इन्क्रीमेंट रोखलं. माझी पीआय हजर करुन घेत नाही आहे, सीपी ऑफिसला जा म्हणते, तर सीपी ऑफिस पीआयकडे जा, म्हणत आहे, असं या ऑडिओ क्लिपमध्ये. त्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अनिल मुळे यांनी आत्महत्या केल्याचं संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस तपास करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here