वाचा-
क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या लॉर्ड्स मैदानावर कोणत्याही भारतीय फलंदाजाकडून झालेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी दिग्गज कपिल देव यांनी १९८२ साली १६८ धावा देत ८ विकेट घेतल्या होत्या. आता सिराजने १२६ धावात ८ विकेट घेऊन देव यांना मागे टाकले. या यादीत आरपी सिंग तिसऱ्या स्थानावर आहे, त्याने ११७ धावा देत ७ विकेट घेतल्या होत्या.
वाचा-
दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावात इंग्लंडचा ऑलआउट केला. इंग्लंडच्या २० विकेट भारातच्या जलद गोलंदाजांनी घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजांनी अशी कामगिरी करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी २०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी कामगिरी झाली होती.
वाचा-
कर्णधाराने केले कौतुक
विराट कोहलीने सामना झाल्यानंतर मोहम्मद सिराजचे कौतुक केले. तो प्रथमच लॉर्ड्स मैदानावर खेळत होता. त्याने शानदार गोलंदाजी केली, त्यामुळे हा विजय आणखी खास आहे. नव्या चेंडूसह यश मिळाल्याने चांगली सुरूवात झाली, असे विराट म्हणाला.
अखेरच्या पाचव्या दिवशी भारताने इंग्लंडपुढे ६० षटकात २७२ धावांचे लक्ष्य दिले. पण भारताच्या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर थांबू दिले नाही. सिराजने ४, जसप्रीत बुमराहने ३, इशांत शर्माने २ तर मोहम्मद शमीने १ विकेट घेतली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times