१७ वर्षीय तरुणी शिरोळ तालुक्यातून चार दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. मुलीनं सासरी नांदायला नकार दिल्यानंतर जन्मदात्या वडिलांनी मुलीला दानवाड येथील दूधगंगा नदीच्या पुलावरुन नदीत ढकलून दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर पोलिसांनी रविवारी नदीपात्रात शोधमोहिम व चौकशी सुरू केली. त्यानंतर चिकोड तालुक्यातील कल्लोळ याठिकाणी दूधगंगा नदीपात्रात तिचा मृतदेह सापडला होता.
मृतदेह आढळल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा पंचनामा करण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसंच, वडिलांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणे आणि तिची हत्या करणे अशा दुहेरी गुन्ह्यात आरोपी वडील अडकण्याची शक्यता आहे. ही खून आहे की आत्महत्या हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times