मुंबईः थकीत बिलाचे पेमेंट करण्यासाठी २० लाखाची लाच मगितल्या प्रकरणी मुंबई मोनोरेलचे चीफ ऑपरेटिंग ऑफीसर डॉ. डी. एन.एल.मूर्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली आहे.

लाच मिळावी म्हणून संबंधित कंपनीची फाईल जाणीवपूर्वक अडकवून ठेवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदाराची फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी असून या कंपनीला प्रकल्पाअंतर्गत साफसफाई, हाऊसकिपिंग संबंधित कामे जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० पर्यंत कंत्राट देण्यात आलं होतं. काम पूर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे कामाचे दोन कोटी १० लाख तसेच २२ लाख रक्कम मिळणे अपेक्षित होती. मात्र, वारंवार कार्यालयात रक्कम मिळवण्यासाठी कार्यालयात जात होते. त्यानंतर फेब्रुवारी ते मार्च २०२१पर्यंत त्यांच्या कंपनीला दोन कोटी दहा लाख रुपये मिळाले.

be;e_

कंपनीचे २० लाख रुपयांचे बिल आणि ११ लाख गँरटी रक्कम मुंबई मोनोरेलकडे थकीत होते. थकीत रक्कम मिळवण्यासाठी कंपनीने पाठपुरावा केला मात्र लाच मिळावी यासाठी आरोपी डॉ. डीएनएल मूर्ती यांनी फाईल आपल्याकडे अडकून ठेवली असल्याचा आरोप त्यांनी केला.

सदर कंपनीने या प्रकरणाची मुंबई एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत तात्काळ सखोल चौकशी करण्यास सुरू केली. या प्रकरणी एसीबीनं गुन्हा नोंदवला असता तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here