नाना पटोले यांचा जालन्यात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नाना पटोले यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली. ‘भाजपने लोकांना फसवलं आहे, आता कशाच्या बळावर तुम्ही जन आशीर्वाद यात्रा काढत आहात?’ असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीसांवर आरोप
राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध समाजाच्या आारक्षण प्रश्नावरून वातावरण तापलं आहे. अशातच जालन्यात बोलताना नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला.
‘लोकांना खोटं बोलून भाजपने सत्ता मिळवली आणि महागाई वाढवली. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी ही काँग्रेसची जुनी मागणी असून मी विधानसभा अध्यक्ष असताना अध्यक्षाच्या खुर्चीवर बसून ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव विधानसभेत पारीत केला. ओबीसी आरक्षण जाण्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. मात्र तत्कालीन फडणवीस सरकारने ओबीसींना फसवण्याचं काम केलं,’ असा पलटवार नाना पटोले यांनी केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times