दिल्लीतील वाढता हिंसाचार पाहता अमित शहा यांनी तिरुवनंतपूरमचा दौरा रद्द केलाय. पद्म विभूषण पी. परमेश्वरनजी यांच्या प्रार्थना सभेसाठी ते केरळला जाणार होते. अमित शहा यांनी गेल्या २४ तासांत घेतलेली ही तिसरी बैठक होती. जवळपास तीन तास ही बैठक चालली. या बैठकीत दिल्ली पोलीसमधील वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारी होते.
दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दगडफेकीत १८० हून अधिक जण जखमी झालेत. दिल्ली पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे. दिसताच क्षणी गोळी घालण्यात येईल, अशी घोषणा दिल्ली पोलिसांकडून हिंसाचारग्रस्त भागात केली जातेय. हिंसाचारामुळे ईशान्य दिल्लीतील शाळा, कॉलेज उद्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. तर सीबीएसईने या भागातील १०वी आणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times