: मालासह ट्रक चोरून नेणाऱ्या टोळीला वाळुज पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीतील चार सदस्यांकडून चोरीला गेलेला ट्रक ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती वाळुज पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आकीब हारून मणियार, मोहम्मद सालेम जमीर कुरेशी (रा. संगमनेर), नितीन अशोक जगताप (रा. अहमदनगर) आणि नासेर गुलाबभाई (रा. संगमनेर) यांचा समावेश आहे.

या प्रकरणात वाळुज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश बापू सोनवणे (रा. वाफेगाव, माळशिरस, जि.सोलापूर) हे ११ ऑगस्ट रोजी जालना येथून ट्रक क्रमांक एमएच ४५-२१२२ मधून १९ ते २० टन लोखंडी सळई घेऊन एकटेच निघाले होते. त्यानंतर सकाळी ५.३० वाजताच्या दरम्यान गंगापूरच्या पुढे वाळुज परिसरात एका पुलाजवळ एका हिरवी रंगाची स्कॉर्पिओ कार आडवी लावण्यात आली.

या ट्रकमधून ट्रक चालक उमेश सोनवणे याला जबरदस्तीने बाहेर काढून त्याचे तोंड व हातपाय बांधण्यात आले आणि त्याला धुळे महामार्गावर नेऊन सोडण्यात आले.

या प्रकरणाची तक्रार वाळुज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. या चोरीचा तपास करण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक कौशल्याचा वापर करून वाळुज पोलिसांनी या चार आरोपींना ताब्यात घेतले. तसंच चोरीला गेलेला मालही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याच्या सहा दिवसात एकूण २६ लाखांचा माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे हे तपास करत आहेत.

दरम्यान, ही कारवाई वाळुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप गुरमे, सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलीस उपनिरीक्षक गोरख चव्हाण, सहायक फौजदार शेख सलीम, पोलीस अंमलदार प्रदिप बोरूडे, सचिन राजपूत, सलीम शेख, पंकज गायकवाड, शिवराज खाकरे, पांडुरंग शेळके यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here