सर्वांचा समावेश असेल, असे सरकार आम्हाला अफागणिस्तानमध्ये स्थापन करायचे आहे. आम्हाल युद्ध संपवायचे आहे. आम्हाला कुठलाही अंतर्गत किंवा बाह्य शत्रू नकोय. आमचा कुणीही शत्रू नाही. आमच्या नेत्याच्या आदेशानुसार आम्ही सर्वांना माफ केलं आहे, असं जबीहुल्ला मुजाहिदने सांगितलं.
अफगाणिस्तानमधील आधीचे सैनिक आणि विदेशी सैन्यांसोबत काम करणाऱ्यांविरोधात कुठलाही सूड उगवला जाणार नाही. कुणीही त्यांच्या घराची झडती घेणा नाही. नागरिकांच्या मूल्यांशी मेळ घालणारे नियम लागू करण्याचा अधिकार अफगाणला आहे. यामुळे इतर देशांनी या नियमांचा सन्मान केला पाहिजे, असं तालिबानने म्हटलं आहे.
(तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद काबुलमधील पहिल्या पत्रकार परिषदेत बोलताना… )
महिलांवर कुठलेही अत्याचार आणि भेदभाव होणार नाही. इस्लामच्या आधारावर महिलांना त्यांचे अधिकार देण्यास कटिबद्ध आहोत. महिला आरोग्य आणि इतर क्षेत्रात काम करू शकतात, जिथे त्यांची गरज आहे. सर्वा माध्यम समूहांनी आपलं काम सुरू ठेवावं. पण यासाठी काही नियम आहेत. कुठलेही प्रसारण हे इस्लामी मूल्यांविरोधात असू नये. त्यांनी निष्पक्ष असायला हवे. कुणीही असं काहीही प्रसारीत करू नये, जे देशाच्या हिताविरोधात असले, असं तालिबानने स्पष्ट केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times