सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत अशी भूमिका फडणवीस यांनी काल पुण्यात बोलताना मांडली होती. ‘आमच्या सरकारच्या काळात बैलगाडी शर्यतीसंदर्भात कायदा केला होता. दुर्दैवाने त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. पण ती मागे घेण्यासाठी या सरकारनं कोणतीही पाऊले उचलली नाहीत. राज्य सरकारनं लोकांच्या भावना समजून घ्याव्यात,’ असं फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतानाच अमोल कोल्हे यांनी काही गोष्टी फडणवीसांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
वाचा:
‘महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, सांस्कृतिक वारसा, आंतरराष्ट्रीय पर्यटन व देशी गोवंशाचे संवर्धन या दृष्टीने महत्वाचा घटक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी ही आमचीही भूमिका आहे. त्यासाठी माझा केंद्र सरकारकडं सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. बैल या प्राण्याचा ‘संरक्षित प्राणी’ या यादीतील समावेश केंद्र सरकारनं वगळला तर बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होणं शक्य आहे. या मागणीसाठी माजी पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे,’ याची आठवण कोल्हे यांनी करून दिली.
‘संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनाच्या काळात देखील विद्यमान पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचीही भेट घेऊन पुन्हा एकदा त्यांना यासंदर्भात पत्र दिलं आहे. याशिवाय संसदेत याबाबत वेळोवेळी मी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी आवाज उठविलेला आहे. या कामी आपलीही साथ लाभली तर केंद्र सरकार यावर लवकर निर्णय घेईल. यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून केंद्र सरकारकडं पाठपुरावा केल्यास बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होणे आणखी सोपे होईल, असा खोचक सल्ला कोल्हे यांनी दिला आहे. केंद्रीय मंत्री रुपाला यांना दिलेल्या पत्राची प्रतही कोल्हे यांनी ट्वीट केली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times