अनिल देशमुखांना ईडीसमोर हजर राहता येणार नसल्याचा अर्ज दाखल करण्यासाठी ईडी कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. ईडीला काही काळ वाट पाहण्यास आम्ही सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात आम्ही याचिका दाखल केली आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल तोपर्यंत थांबाव, असं पत्र आम्ही ईडीला दिलं आहे, असं अनिल देशमुखांचे वकिल इंदरपाल सिंह यांनी म्हटलं आहे.
तसंच, ईडीच्या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आम्ही चौकशीसाठी हजर राहू, असं देशमुखांच्या वकिलांनी सांगितलं आहे.
वाचाः
दरम्यान, गृहमंत्री या नात्याने देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप मुंबईचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. या आरोपानुसार ‘ईडी’ने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यामध्ये देशमुख यांचे स्वीय सचिव व स्वीय सहाय्यक, यांना अटक करण्यात आली आहे. तसेच देशमुख व त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची सुमारे साडे चार कोटी रुपयांची मालमत्तादेखील जप्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘ईडी’ने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी चार वेळा समन्स बजावला होता.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times