सूर्यकांत आसबे,

अंगात पोलिसांची वर्दी, हातात खेळण्यातील बंदूक, डोक्यावर टोपी, कमरेला पोलीस पट्टा, तोंडात शिट्टी आणि खांद्याला अडकवलेली व प्रमाणपत्रांनी भरलेली फाटकी पिशवी. हे चित्र आहे एका बहुरूपी कलाकाराचे. महाराष्ट्रात विविध प्रकारचे लोककलावंत आहेत. बहुरूपी हा त्यातीलच एक प्रकार. हे कलाकार कोणाचीही हुबेहूब नक्कल करून सर्वांना आनंद देऊन आपली उपजीविका भागवतात. यामध्ये प्रामुख्याने फौजदार,शंकर, हनुमान यांचे वेष धारण करून गावोगावी फिरून आपल्या संसाराचा गाडा हाकतात. मात्र आज या बहुरूपी कलावंतांचे पोटापाण्याचे हाल होताना दिसत आहेत.

मोबाईलच्या रूपानं करमणुकीची साधनं थेट हातात आल्यामुळे बहुरूपी कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पोलिसांच्या वेशात येणाऱ्या या कलावंतांना भामटे व फसवेगिरी करणारे लोक समजून त्यांना जनतेच्या रोषाला देखील अनेकदा सामोरे जावे लागते. निरनिराळी सोंगं करणारी ही बहुरूपी जमात आता काळाच्या ओघात लुप्त होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

क्लिक करा आणि वाचा-
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण घडी विस्कटून गेली आहे. सामान्य माणसांचे जगणे मुश्किल बनले आहे. उद्योग व्यवसाय मोडकळीस आलेले आहेत. त्यातच हाताला काम नसल्याने बेकारीसुद्धा वाढली आहे. कलाकारांचे हाल तर त्याहून अधिक खराब बनले आहेत. ग्रामीण भागातील कलाकार आता शहरी भागात आपली कला सादर करून उपजीविका करू लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महीम गावचे ५५ वर्षाचे बहुरूपी कलाकार विठ्ठल गोरख इंगोले सध्या सोलापुरातील गल्लोगल्ली फिरून आपली सादर करून लोकांची करत उपजीविकेसाठी धडपडत आहेत. त्यांच्या तोंडून बाहेर पडणारी धमाल कॉमेडी सर्वांचे मनोरंजन करते.

क्लिक करा आणि वाचा-
दोन एकर शेती मात्र पाण्याविना करपली. ४ मुले आणि एक मुलगी तसेच पत्नी व दोन सुना असा प्रपंच चालविताना विठ्ठल इंगोले यांना जगण्याची कसरत करावी लागत आहे. २० वर्षे बहुरूपी म्हणून जनतेला निखळ आनंद देणारे बहुरूपी कलाकार शासनाच्या सवलतींपासून वंचित असल्याचे विठ्ठल सांगतात.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here