सुरक्षा रक्षक ईश्वरदास तुळशीराम बाहेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलीस ठाण्यात दोन्ही कैद्यांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉम्बस्फोटात फाशीची शिक्षा झालेला (वय ४०) आणि खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप झालेल्या मोहम्मद आजम असलम भट (वय ४०) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्यांची नावे आहेत.
नावेद व आजम या दोघांना फाशी यार्डात ठेवण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास दोघांना नाश्त्यासाठी यार्डातून बाहेर काढण्यात आले. तिथेच दोघांमध्ये वाद झाला. त्यातून दोघांनी एकमेकांना मारहाण करायला सुरुवात केली. सुरक्षा रक्षक ईश्वरदास यांनी मध्यस्थी केली असता दोघांनी ईश्वरदास यांच्यावरही हल्ला केला. त्यानंतर अन्य सुरक्षा रक्षकांनी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले व दोघांनाही वेगेवगळ्या फाशी यार्डात ठेवण्यात आले. या घटनेने कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times