कल्याण-डोंबिवलीतील जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांवर हे गुन्हे दाखल केले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पंतप्रधानांच्या आदेशानुसार सोमवारी, १६ ऑगस्ट रोजी डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि १८ ऑगस्ट रोजी कल्याण पश्चिमेकडे जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले. यावेळी कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क दिसत नव्हते. सामाजित वावराच्या नियमही पाळला गेला नाही. या जना आशीवार्द यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर राजकीय व्यक्तींना एक न्याय आणि सर्वसामान्यांना एक, यासारख्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून समाज माधम्यांवर व्यक्त केल्या. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नियम सर्वांना सारखे असावेत. नियमाचा भंग जन आशीर्वाद यात्रेत झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी केली होती. त्यानंतर पोलिस प्रशासनाने बुधवारी दुपारनंतर कल्याणमधील खडकपाडा, महात्मा फुले चौक आणि डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यात कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासह मोरेश्वर भोईर, संजय तिवारी, नंदू परब यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर कल्याणमधील खडकपाडा आणि महात्मा फुले चौक या दोन्ही पोलिस ठाण्यात भाजपचे माजी शहराध्यक्ष अर्जुन म्हात्रे यांच्यासह दहा जणांहून अधिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times