जिल्हा बँकेने एका खासगी कंपनीत ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यात दलाली पोटी ३.३९ कोटी रुपये देण्यात आले. ही गुंतवणूक थेट बँकेकडून झाली असताना दलाली देने बंधनकारक नव्हते. त्यामुळे बँकेची ३.३९ कोटींनी फसवणूक झाली अशी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी व जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी १५ जून रोजी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली होती.
यामुळे अधिकारी, कर्मचारी व सहा दलालावर अशा ११ जनावर फसवणूक, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता यात थेट ईडीने दखल घेतल्याने खळबळ उडाली आहे. भाजप आमदार प्रताप अडसळ यांनी सातत्याने बँकेविरुद्ध रान पेटवत यात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. आता ईडीच्या पत्राने स्थानिक प्रशासन व बँकेच्या माजी पदाधिकारी व संचालकांच्या मनात धाकधुक वाढली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times