वाचा:
औंध येथील मयूर मुंडे व त्याच्या सहकाऱ्यांनी परिहार चौकात मंदिर उभारलं होतं. त्यात मोदींचा अर्धपुतळा बसवण्यात आला होता. एक प्रकारे मोदींना देवाचं स्थान देण्यात आलं होतं. त्यासाठी मुंडे यांनी सुमारे दीड ते दोन लाख रुपये खर्च केले होते. मोदींच्या या मंदिरावरून सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू होती. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी यापासून हात झटकले होते. हे मंदिर उभारण्याशी भाजपचा काहीही संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. हे सगळं सुरू असतानाच बुधवारी रात्री अचानक येथील मोदींचा पुतळा हटवण्यात आला आहे.
मोदींचा पुतळा हटवण्यात आल्याचं समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तिथं पोहोचले आणि त्यांनी उपरोधिक आंदोलन केलं. ‘एका माथेफिरू मोदीभक्तानं नरेंद्र मोदींचं मंदिर पुण्यात बांधलं. या मंदिराला भेट देऊन पेट्रोल, डिझेलचा नैवेद्य दाखवून साकडं मागण्यासाठी आज आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते इथं आलो. मात्र आम्ही येण्यापूर्वीच मोदीजी इथून झोला उचलून निघून गेल्याचं निदर्शनास आलं.
वाचा:
या मंदिरात असलेली मोदींची मूर्ती आता गायब झाली आहे. कोणत्याही संकटाला घाबरून पळ काढण्याची मोदींची वृत्ती या मूर्तीच्याही अंगी आहे. तरीही या पवित्र ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो आणि मोदीजी महागाई कमी करतील, युवकांना रोजगार देतील, कधीतरी खरं बोलतील अशी अपेक्षा व्यक्त करतो,’ अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times