मुंबई: प्रजा फाऊंडेशनने मुंबई महामापालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेत गुरुवारी संयुक्त प्रगती पुस्तक अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालानुसार पहिल्या क्रमांकावर पालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नगरसेवक रवी राजा, दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे समाधान सरवणकर आणि तिसऱ्या तक्रमांकावर भाजपच्या हरीश छेडा यांची निवड झाली आहे. ()

करोना प्रादूर्भावामुळे प्रजा फाऊंडेशनने यंदा नगरसेवकांचे वार्षिक प्रगती पुस्तक तयार केलेले नाही. त्याऐवजी संयुक्त प्रगती पुस्तक तयार केले आहे. त्यात रवी राजा, समाधान सरवणकर व हरीश छेडा या तिघांना अनुक्रमे ८१.१२ टक्के, ८०.४२ टक्के आणि ७७.८१ टक्के गुण प्राप्त झाले आहेत.

वाचा:

करोना प्रादूर्भावामुळे प्रजा फाऊंडेशनने यंदा नगरसेवकांचे वार्षिक प्रगती पुस्तक तयार केलेले नाही. त्याऐवजी नगरसेवकांच्या २०१७ ते २०२१ पर्यंतच्या चार वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. या संयुक्त प्रगती पुस्तकात प्रजा फाऊंडेशनने विशिष्ट निकषांची गोळाबेरीज केल्यानंतर मुंबई पालिकेतील एकूण नगरसेवकांपैकी केवळ १० टक्के म्हणजेच २२ नगरसेवकांचा ‘अ’ आणि ‘ब’ श्रेणीत समावेश आहे. तर उर्वरित नगरसेवकांचा क, ड, ई, फ श्रेणीत समावेश झाला आहे.

वाचा:

प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात मौनीबाबा म्हणून कोण असतील, याची मुंबईकरांना उत्सुकता असते. यंदा हा ‘मान’ एआयएमआयएम पक्षाच्या खारमधून निवडून आलेल्या गुलनाझ कुरेशी यांना मिळाला आहे. त्यांनी २०१७ ते २०२१ पर्यंतच्या चार वर्षांत त्यांनी सभागृहात एकही प्रश्न उपस्थित केलेला नाही. त्यांच्याप्रमाणेच एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंतच्या बैठकीत ३० नगरसेवकांनी एकही प्रश्न मांडलेला नसल्याचेही फाऊंडेशन अहवालात म्हटले आहे.

नेमकी टक्केवारी

प्रगती पुस्तकानुसार सरासरी गुण ५५.१० टक्के असून गेल्या कार्यकाळातील (एप्रिल २०१२ ते २०१६) मध्ये ५८.९२ टक्के सरासरी गुण होते. तसेच, यंदाच्या चार वर्षाच्या कालावधीत एकूण २२० नगरसेवकांपैकी केवळ दोघांना अ आणि २० जणांना ब श्रेणी आहे. १२७ नगरसेवक क आणि ड श्रेणीत आहेत. ७१ नगरसेवक ई आणि फ श्रेणीत आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here