शिवसैनिकांच्या या शुद्धिकरणावर भाजप नेते, आमदार यांनी टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेला शुद्धिकरण करण्यासाठी शुद्ध अस्तित्व आणि अधिष्ठान आहे का, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने सोनिया गांधी यांच्या नावाची शपथ घेतली आणि काँग्रेसशी सलगी केली. अशा शिवसेनेला मुळात शुद्धिकरणाची गरजच काय, असे टीकास्त्र आशीष शेलार यांनी विचारला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना छगन भुजबळ यांनी तुरुंगात टाकले. त्या छगन भुजबळ यांच्याशी सत्तेसाठी सलगी करणाऱ्या शिवसेनेचेच शुद्धिकरण करण्याची आवश्यकता आहे, असा टोला शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे.
‘शिवसैनिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या’
शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. त्यांना स्मारकाचे शुद्धिकरण करावे असे वाटत असेल तर ते रास्त आहे. नारायण राणे कुटुंबीयांनी ठाकरे कुटुंबाला अतिशय त्रास दिलेला आहे. तसेच त्यांनी ठाकरे कुटुंबीयांचे बदनामी देखील केलेली आहे. एकीकडे हिंदुहृदयसम्राटांच्या आणाभाका घ्यायच्या, बाळासाहेब माझे सर्वकाही आहेत असे म्हणायचे आणि त्यांच्याशीच गद्दारी करायची आणि पुन्हा निर्ल्लजपणे आशीर्वाद मागायचे यायचे हे कोणत्या तत्वात बसते असा सवाल शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी विचारला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत, त्यांचा हा संताप आहे आणि त्यांचा संताप व्यक्त करण्याचा त्यांना अधिकार आहे, असेही त्या म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
शिवसेनेचे शुद्धिकरण जाऊद्या पण भाजप हा कोणता पक्ष आहे, तो भाजप आता राहिलेला आहे का. ही ओरिजनल भाजप आहे का? मूळ भाजपचा कुणी केंद्रीय मंत्री झाला असता तर सर्वांनाच आवडले असते. भाजपत विनोद तावडे, पंकजा मुंडे अशा अनेकांवर अन्याय झालेले आहेत., असे ही कायंदे म्हणाल्या.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times