पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तर शिवाजीनगर तांडा क्र.२ येथील तीस घरांची वस्ती वाहून गेल्यामुळे खळबळ माजली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असताना आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यांतर्गत उमरखेड तालुक्यातील दराटी गावातील शिवाजीनगर तांड्याच्या वरील बाजूस असलेला तलाव ओव्हरफ्लो झाला व कॅनॉल तोडून पावसाचे पाणी सकाळी ६ ते ७ च्या सुमारास गावात शिरले. ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळी आपल्या मुलाबाळासह आश्रय घेतला. पण त्यांचे घरदार घरातील सामानासह वाहून गेल्याने संपूर्ण गावच उघड्यावर पडले आहे तर दराटी गावाशेजारील मोठ्या नाल्यात आलेल्या पुराचे पाणी तुंबल्याने दराटी व साठेनगर भागातील ९० ते १०० घरात पाणी घुसल्याने त्यांच्या घरातील अन्नधान्य, रासायनिक खते व इतर साहित्य भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या महापुरामुळे शेतातील उभी पिके वाहून गेली आहेत व जमिनी खरडल्या आहेत. महसूल प्रशासनाने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे तर दराटी पोलिसांनीही नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे दराटी पोलिसांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times