म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर

जिल्ह्यातील भद्रावती येथील चांदा आयुध निर्माणी वसाहत भागात एक बिबट मृतावस्थेत आढळला आहे. बिबट्याचे शवविच्छेदन सायंकाळी करण्यात आले असून वाघाशी झालेल्या झुंजीत त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता उघडकीस आली आहे. (A was found dead in Chandrapur)

चांदा आयुध निर्माणी वसाहत भागातील केंद्रीय विद्यालयाच्या समोर एक बिबट मृतावस्थेत आढळला. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी ताबडतोब दाखल झाले. सदर बिबट सुमारे ७ वर्षांचा असून नर आहे. त्याच्या शरीराचे सर्व अवयव शाबूत होते. त्याच्या शरीरावर असंख्य ओरबडल्याच्या जखमा होत्या. चंद्रपूर येथील टीटीसी (वन्यप्राणी उपचार केंद्रात) मध्ये बिबट्याचे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडचेलवार, डॉ.एकता शेडमाके यांनी केले. बिबट्याचा मृत्यू हा बुधवारी रात्री झाल्याची दाट शक्यता सूत्रांनी म.टा.शी बोलताना व्यक्त केली.

क्लिक करा आणि वाचा-
शवविच्छेदनानंतर सदर बिबट्याचा मृत्यू हा वाघाशी झालेल्या झुंजीत झाल्याचे झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here