आटपाटी तालुक्यातील झरे या गावी बैलगाडा शर्यत होणार असल्याचं सांगत गोपीचंद पडळकरांनी सरकारला आव्हाव दिलं होतं. ही शर्य होऊ नये म्हणून पोलिस प्रशासन सज्ज झाले होती. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिसांनी कटेकोट बंदोबस्त तैनात केला होता. शर्यत स्थळावरही पोलिस उपस्थित होते. मात्र, पोलिसांना चकवा देत पडळकरांनी रातोरात दुसऱ्या जागेवर मैदान तयार करत शर्यत भरवली आहे.
वाचाः .
गोपीचंद पडळकरांनी पोलिसांना चकवा देत एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रॅक बनवून बैलगाडा शर्यती पार पडल्या. आटपाटी तालुक्यातील निंबवडे- वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान या शर्यती झाल्या. या शर्यतीत पाच ते सहा बैलगाजा चालक आणि मालक सहभागी झाले होते, अशी माहिती समोर येतेय. गोपीचंद पडळकरांनी भरवलेल्या बैलगाडा शर्यतीवर पोलिस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times