मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची काल मुंबईतून सुरू झाली. त्याआधी राणे यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर अभिवादन केले. राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाऊ देणार नसल्याच्या इशारा शिवसेनेच्या काही नेत्यांनी दिला होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना कोणीही विरोध केला नाही. त्यावरून राणेचे पुत्र आमदार (Nitesh Rane) व माजी खासदार (Nilesh Rane) यांनी विरोधाची भाषा करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

नीतेश आणि नीलेश दोघांनीही या संदर्भात ट्वीट केलं आहे. ‘अडवण्याची भाषा करणारे गोमूत्रावर आले… म्हणून पुढच्या वेळी मर्यादेत राहायचं,’ असा टोला नीतेश यांनी हाणला आहे.

नीलेश यांनीही नेहमीप्रमाणे कडवट शब्दांत टीका केली आहे. ‘स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मारकावर ते कोण आडवे येणार होते, त्यांच्यातला एक सुद्धा दिसला नाही. धमकीची वार्ता राणेंसोबत करायची नाही, आम्ही धमक्यांना भीक घालत नाही. निघून गेल्यानंतर गोमूत्र शिंपडलं, समोर असते तर तेच गोमूत्र कोल्ड्रिंकसारखं घशात घालून पुढे निघालो असतो,’ असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे. औकातीत राहायचं, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोणी केली होती विरोधाची भाषा?

जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यापूर्वी नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळी नतमस्तक होणार असल्याचं समजताच रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राणे यांनी तीव्र नाराजी दर्शवली होती. ‘कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तरी हरकत नाही, पण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळी जाऊ देणार नाही. राणे तिथं आले तर हाकलून देऊ. बाळासाहेबांच्या स्मारकावर जाण्याचा राणेंना अजिबात अधिकार नाही,’ असं राऊत म्हणाले होते. अर्थात, शिवसेनेनं याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. त्यामुळं प्रत्यक्षात कुणीही राणेंना अडवलं नाही.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here