नागपूरः ‘ज्यांनी स्मारकाचे शुद्धीकरण केले त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता,’ अशी जहरी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेवर केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मारकास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट देऊन वंदन केल्यानंतर काही तासांतच शिवसेनेतर्फे स्मारकाचे शुद्धीकरण करण्यात आले. या घटनेनंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केलं आहे.

‘त्या लोकांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वाचाः

‘ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवून त्यांच्या समाधीवर कोणी जात असेल, तर ती समाधी अप्रवित्र झाली असं सांगता. ही कृती अयोग्य आहे,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वाचाः

स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण

नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीची भावना होती. त्यामुळे राणे तेथून गेल्यानंतर स्मृतिस्थळी दुग्धाभिषेक करण्यात आला; तसेच गोमूत्राने शुद्धीकरण केले गेले. स्मृतिस्थळाची देखभाल करणारे अप्पा पाटील यांनी हे शुद्धीकरण केले.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here