करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी करोना संसर्गाचा धोका अजूनही कमी झालेला नाही. करोना लसीचे दोन डोस घेऊनही करोना झाल्याचं समोर येत आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनीही करोना लसीचे दोन डोस घेतले होते. त्यानंतरही त्यांची करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
वाचाः
अमोल कोल्हे यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देत एक ट्वीट केलं आहे. करोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला करोना सदृश लक्षणे दिसत आहेत. करोना प्रतिबंधक लसींचे दोनही डोस पूर्ण झाले आहेत. तरीही चाचणी केल्यानंतर माझा आरटी-पीसीआर अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. शिवाय, माझी प्रकृती स्थिर आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
वाचाः
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत. मतदारसंघातील पूर्वनियोजित दौरा सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना आवाहन आहे की त्यांनी लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करुन घ्यावी. शक्यतो गर्दीची ठिकाणी टाळावेत. व निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करावे, असं आवाहन अमोल कोल्हेंनी केलं आहे.
दरम्यान, लोकप्रतिनिधींनीही करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. मतदारसंघातील कामे, राजकीय दौरे यामुळं लोकप्रतिनिधींना करोनाची लागण होते. भाजपचे खासदार उदयनराजे यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times